Ad will apear here
Next
जैसी हरळांमाजी रत्नकिळा...


‘मराठी भाषा म्हणजे जणू कस्तुरी आणि कल्पतरूच,’ असं म्हणणारी फादर ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांची कविता आज पाहू या...
.......
जैसी हरळांमाजी रत्नकिळा।
कि रत्नांमाजि हिरा निळा।
तैसी भासांमाजि चोखाळ।
भासा मराठी।।

जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी।
किं परिमळांमाजि कस्तुरि।
तैसी भासांमाजि साजिरी।
मराठिया।।
 
पाखियांमधें मयोरु।
ब्रुखियांमधे कल्पतरु।
भासांमधें मानु थोरु।
मराठियेसी।।
 
तारांमधे बारा रासी।
सप्तवारांमधें रवि-ससी।
या दीपिचेआं भासांमध्ये तैसी।
मराठिया।।
ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQDCJ
Similar Posts
माझा मराठाचि बोलु कौतुकें २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो. त्या निमित्ताने आजपासून प्रसिद्ध करत आहोत मराठीचं कौतुक करणाऱ्या काही कविता. या उपक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या रचनेपासून...
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language